नभ भरुनी आलेले

नभ भरुनी आलेले -
तिथे होता गारवा मनाला हवाहवासा वाटणारा 
तिथे होता फक्त मातीलाच न्हवे; तर अवघ्या वातावरणाला -
एक फुफ्फुस भरून सुगंध.
तिथे आपण च होतो ढगात असे न्हवे तर 
ढग होते वहात आपल्या अंगोपांगातून 
आपल्या कणाकणाला मोहरून टाकत कुरवाळणारे.
तिथे राहिलं मोबाईल चॅट, इंटरनेट, पुस्तकं असं सगळं 
एका बाजूला.
आणि सुरू झाला एक संवाद त्या ढगांशी, भन्नाट वाऱ्याशी,
सळसळणार्या पानांशी, फुलांशी आणि झाडांशी.
आणि सुरू झाला संवाद 13 व्या अध्यायात ल्या सारख्या 
वाढत वाढत जाऊन विश्व रूप धारण करणाऱ्या 
जगदव्यापी नारायणाशी । 
भूक, तहान च काय; काळ, वेळ सुटला सारा बंध 
वाटत होतं थांबावा कायम काळ असाच इथल्या मातीवर
आणि लोळावं त्यात मनसोक्त. 
नसतात खरे खुरे वर्णक शब्द - विशुद्ध आनंद आणि संपूर्ण शांततेला
थांबवतो म्हणून आता हा प्रपंच हा काव्याचा 
अनुभवा तो ' दिल से ' तुम्हीपण आणि सांगा खरा वाटतोय का हा प्रवाह शब्दांचा  ?! ✍️✍️
By डॉक्टर प्रसाद फाटक पुणे 9822697288

Comments