memories. आठवणी चा ठेवा.

आठवणींचा ठेवा - 
एखादी theory लोकप्रिय झाली की लोक तिच्याच मागे लागतात आणि विचार न करता पुन्हा पुन्हा तेच पुढे ढकलत रहातात. अशीच एक लोकप्रिय theory म्हणजे वर्तमानात जगा! 
वस्तुतः हा विचार एक अत्यंत मर्यादित विचार आहे. तो एका संदर्भा पुरता मर्यादित आहे. आणि तेवढा च बरोबर आहे की बाबांनो भूतकाळाचे बॅगेज आणि भविष्याचे मुरालीलाल चे हसीन स्वप्ने यात वेळ घालवू नका ।
यावर विचार केला तर पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे, खरंच असं कोणी वर्तमानात जगू शकेल का हो ? तर त्याचं उत्तर आहे - नाही नाही. 
व्यक्तिगत जीवनात आपला प्रत्येक क्षण भूत आणि भविष्याशी जोडलेला असतो.  शरीर क्रिया पण अशी त्रिकाल संदर्भाने चालू असते. DNA चं स्मरण पॅकेज नसेल तर एका ही प्रोटीनची शरीरात आवश्यक अशी रचना होऊ शकणार नाही. तसेच भविष्यात जर tissues जर clog व्हायला नको असतील तर मृत पेशी बाहेर काढायला हव्यातच. तर असा त्रिकाल खेळ चालू असतो आतमध्ये. आपल्याला एकदा आगीने भाजले तर लक्षात रहातं म्हणून तर पुढच्या वेळेस आग दिसताच हात मागे येतो. 
म्हणून म्हणतो मित्र मैत्रिणींनो त्रिकाल मे रहो.
मग कसं करायचं हे आठवणींचे पॅकिंग ? तर ते अगदी सोपं आहे आपण भाजी कशी निवडतो ? अगदी तसं - जे अस्वच्छ आहे ते काढून टाकायचं आणि जे योग्य आहे ते ठेवून द्यायचं. ज्या आठवणी त्रास देतात त्या ठेवायच्या नाहीत. त्या बाजूला सारायच्या. माझा एक अनुभव सांगतो मुलं शिकायला दूर गेली,वडील गेले, एक सच्चा मित्र गेला त्यानंतर आधी त्यांच्या आठवणी बऱ्या वाटल्या पण नंतर त्रास देवू लागल्या.मग मी जसे स्ट्रेस मॅनेज करतात ना तशी management केली. गीता व उपनिषदांचे मार्ग दर्शन पुन्हा घेतलं आणि मग जमलं. मन दुःख मुक्त झालं व पुढील काम सोपं झालं.
दुसरं ज्यातून आता व पूढे काय करू ते सांगतात त्या आठवणी वापरायच्या. जसे मगाशी आगीचे उदाहरण दिले तसे. 
आणि काही आठवणी बटाट्याच्या रस्सा असतो तशा असतात. रोज खाता येत नाही पण खूप आवडतो.  म्हणून कधीतरी जगलेले ते क्षण सहज आठवणीत असें चघळयाचे की जणू आपण ते आत्ताच जगतो आहोत. माझ्या स्क्रीन सेवर ला डाउनलोड फोटो बरोबरच आमचे ट्रिप चे फोटो पण असतात. तो क्षण पटकन डोळ्यासमोर येतो आणि खुदकन हसू फुटतं, मन एकदम फ्रेश होऊन जातं. त्यालाच कोणी मर्म बंधातली ठेव असं म्हणतात ती जपुन ठेवायची आणि पुरवून पुरवून खायची . त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते.
चौथ्या असतात आपण केलेल्या चुकांच्या आठवणी त्या जपायच्या नाहीत,पुसायचा पण नाहीत त्यावर प्रक्रिया करायची. एक म्हणजे पुन्हा करणार नाही हे मनोमान ठरवायचं आणि दोन म्हणजे त्यातून जर ज्याला किंवा जिला आपण hurt केलं असेल त्यांची मनात माफी मागायची. आणि जास्त न रेंगाळता पुढे सरकायचे.
यशस्वी माणसाला - आपण काल कुठून आलो याची जाण देखील त्याचे किंवा तिचे पाय जमिनीवर राहायला मदत करते. फक्त त्याचा माज नाही चढू द्यायचा.
पाचवे म्हणजे आठवणी या स्ट्रेस मॅनेज करायला वापरता येतात जसे मला स्ट्रेस आला की मी गोव्यात जाऊन येतो. डिचोली च्या रस्त्यांवर, हिरव्या गार माडांमध्ये, स्वयंसेवकांच्या घरी,विस्तीर्ण हिरवं मैदान जिथे आम्ही क्रिकेट खेळलो, वाळशीचे निळे हिरवे तळे, काजूच्या बागांचा डोंगर... एवढी चक्कर पुरते !
तर अशा जपायच्या आणि वापरायच्या आठवणी. 
धन्यवाद माझी आठवण ठेवल्या बद्दल आणि आठवणीने हे वाचल्या बद्दल 
डॉ प्रसाद फाटक पुणे.

Comments