*डाकोटा ते डाकोरनाथ :*
वस्तुतः हा छोटा लेख *स्वतःबद्दल खरं काय ते सांगावं* आणि उगीच खोटा समज व्हायला नको म्हणून आहे. 🤗
[ ही दोन नावे केवळ अनुप्रासासाठी घेतली आहेत.
डाकोटा हे आकर्षणाचे / रोमान्स चे प्रतीक 💝
आणि डाकोरनाथ हे परमात्मा परमेश्वराचे प्रतीक. 🕉️ ]
माझ्या पोस्ट वरून असे वाटेल की *हा फार देव - देव वाला आहे; तर तसे काही नाहीये.* दोन्ही प्रिय आहेत - एकच नाही एवढंच सत्य सांगायचं आहे.
मग जास्त करून देवाच्या पोस्ट का टाकतोस ? सिनेमाच्या का नाही ?
उत्तर असं आहे की; नैसर्गिक आकर्षणात प्रचार करण्यासारखं काही नाही - ते सहजच होतं.
पण *माणुसकी / बॅलन्स / देव* हे मात्र सांगायला लागतं ! आदि शंकराचार्यान पासून ते श्री शंकर ( अभ्यंकर ) पर्यंत सगळे सांगत आले आहेत.
{ पुन्हा एक अनुप्रास पंच काढला 😅🤣 }
मी तेच अगदी किरकोळ प्रमाणात का होईना; पण न दमता बोलतोय झालं.
बाकी मानवता हे माझं प्रधान तत्व आहे आणि त्यात डाकोटा आणि डाकोरनाथ दोघेही अगदी फिट्ट बसतात !
धन्यवाद
आपला,
Comments
Post a Comment