आयुष्याला रंग हवा, बहुरंग हवा ।
आव्हानांचा, कडू गोड आठवणींचा काळा हवा ।
आकाशाचा विशालतेचा निळा हवा ।
गोड मधुर रोमान्स चा गुलाबी हवा ।
फेसाळत्या उत्साहाचा पांढरा हवा ।
आवडत्या पदार्थांचा, अन्नदात्या शेतांचा हिरवागार हवा ।
समुद्राचा, गहराई चा गर्द निळा हवा ।
कष्टाचा, घामाचा जल रंग हवा ।
सोन्याचा, समृद्धीचा जर्द चमकता सोनेरी पिवळा हवा ।
आणि त्यागाचा, दुसऱ्यासाठी झिजण्याचा भगवा हवा ।
आणि
रंगुनी रंगात साऱ्या अखेर ईश्वर चरणी समर्पिततेचा विठू सावळा पण हवाच हवा ।।
डॉ प्रसाद फाटक पुणे
9822697288
Comments
Post a Comment