God is one Almighty for all. why quarrel ?

धार्मिक सौहार्द प्राप्त करण्यासाठी स ईश्वर धर्मांचा जो ईश्वर अल्ला गॉड आहे तो वेगळे काही नसून एकच almighty भिन्न नावाने आहे  हे प्रतिपादन मी कुराण बायबल व विष्णु सहस्त्रनाम यांचे दाखले देत जगा समोर आणले व तशी कृती देखील माझ्या वर्तनातून केली. मूळ आधार जो almighty तो एक पण प्रत्येकाने आपल्या श्रद्धेप्रमाणे नावे भिन्न दिली आहेत. मग इतर वेगळेपणा हा गौण आहे हे देखील मी बोललो. 
म्हणून भिन्न भिन्न धर्म या केवळ वेगळ्या वेगळ्या व्यवस्था आहेत. हे त्या त्या धर्मातील विचार करणाऱ्या लोकांनी त्या व्यवस्था निर्दोष करण्याचा व  वरील मुद्दा समाजाला सांगण्याचा प्रयत्न करायला हवा. माझ्या धर्मात तो मी नक्कीच केला आहे . तो प्रत्येकाने आपल्या धर्मात करावा.
मुस्लीम बांधवांनी विचार करण्यासारखी गोष्ट ही की -
मुस्लिम सत्यशोधक चळवळ सारख्या काही क्षीण चळवळी देशात चालल्या व काळाच्या ओघात नष्ट देखील झाल्या. बाकी सगळा बडेजाव तर ओवैसी सारख्या हिंदू द्वेश्ट्या मंडळींचा आहे. त्यामुळे नुकसान मुसलमानांचे होत आहे. 
आणि हा प्रश्न केवळ मुस्लिम समाजाचा नसून संपूर्ण देशाचा आहे. देशातील शांततेचा व सौहार्दाचा आहे. हिंदू व ख्रिश्चन समाजानी जशी विज्ञानाची व आधुनिकतेची कास धरली, सामाजिक चळवळींचा   उपयोग करून मूलगामी व मानवतावादी बदल घडवले तसे तेवढ्या प्रमाणात मुस्लिमांनी केले नाहीत.
त्यांना हे बदला चे असे आवाहन मी या कळकळी पोटी केले व त्यावर काही मुस्लिम युवकांनी मला पाठींबा देखील दर्शवला बाकी काहींनी माझा मुद्दा उडवून लावला. आपल्याला आपल्या समाजात असे मंथन घडवून आणण्याची जबाबदारी आहे. 
त्यामुळे धार्मिक सौहार्द व  मानवता विकसित होणार आहे.
बाकी तो -
अल्लाह मालिक है.
भगवान भला करेगा.
God is great he will see that truth prevails.
Thank you for reading.

Comments