मानव आणि त्याच्या संस्कृती व धर्म

*ग्लोबल मानव धर्म*?
संस्कृती, धर्म आणि मानवता -
वस्तुतः माणसाची पाहिली  *जात 25 लाख* वर्षांपूर्वी आली; तर आपण जे आहोत होमो सेपिअन्स ते  *2 लाख वर्ष* पृथ्वीवर आहोत. आणि मूळ निवासी वगैरे जे वाद उभे केले जातात त्याच्या जर मुळाशी जायचं म्हणलं तर सगळ्यांचंच  *मूळ आफ्रिकेत* आहे! हे इथे नमूद करून पुढे जाऊया.
ज्याला आपण सध्या माणुसकी वगैरे असे म्हणतोय तर ती केव्हाच  *विकून खाऊन* आपण या जगाचे राजे या स्थितीला आलोय हे ही नमूद करतो. पण आता ते सगळं  *irreversible* आहे. म्हणून आता पुढचं बघायचं.
तर साधारण ज्याला ऐतिहासिक म्हणतो तो काळ  *70, 000 वर्षाचा* झालाय या काळात हळू हळू culture म्हणजे  *संस्कृती* निर्माण होऊ लागल्या. या संस्कृतींनी माणसाला  *प्राण्यांपेक्षा वेगळ्या* काही गोष्टी करण्यास प्रवृत्त केलं. इतर प्राण्यांच्यात त्यांच्या त्यांच्या  *genes* प्रमाणे वर्तन घडते. आफ्रिकन सिंह संस्कृती आणि गीर सिंह संस्कृती असे भिन्न काही नसते! 
एक प्रकारे  *मानवतेचा उदय* देखील इथेच झाला. यात माणसाने दुसऱ्या माणसाशी कसे वागावे, समूहात कसे वागावे याचे काही नियम, रूढी वगैरे विकसित होऊ लागल्या. पूढील हजारो वर्षात मग  अनेक  *संस्कृती विकसल्या* व काही लयाला सुद्धा गेल्या. जसे  *रोमन संस्कृती*. 
त्यांनी त्यांनी माणसाच्या  *माणूस म्हणून विकसित* होण्यात सहभाग घेतला. तो ठसा कायम राहिला.
त्यामुळे कोण एकट्या संस्कृती ला त्याचा  *मक्ता मुळी सुद्धा नाही.* जरी एखादि संस्कृती लयाला गेली असली तरी देखील तिचे  *योगदान* राहिलेच आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या मध्ये विविध कारणांनी mixing ही झालेले आहे.
या संस्कृती मध्ये वरील बाबींखेरीज -   *कला, क्रीडा* यांचा विकास आहे, शिवाय  *नीतिमूल्यांचा* समावेश आहे. 
त्यातून पुढे  *ईश्वराच्या संकल्पना* मानवी मनात अंकुरल्या तो एक  *मोठा टप्पा* होता. मग त्याभोवती  *धर्मांचा विकास* देखील होत गेला.
अत्यंत जुना असा  *आस्तेक* लोकांची संस्कृती व धर्म मॅक्सिको मध्ये कशी होती ते आपण मागे पाहिले. सिंधू नदीच्या खोऱ्यात आपली indus /  *हिंदू संस्कृती व धर्म* विकासला आणि सो ऑन. अनेक संस्कृती व धर्मानी  *माणुसकी शिकवली* 
तसेच त्याच्यातील चुकीच्या शिकवणुकी किंवा प्रथा परंपरा तसेच आंतर धर्म स्पर्धा यामुळे  *माणुसकीचे नुकसान* ही केले. अत्यंत विकसित तत्वज्ञान असलेले धर्म देखील याला  *अपवाद नाहीत.*
संस्कृती, धर्म त्यांचे नीतिनियम तसेच मधल्या काळात जी अनेक राष्ट्रे निर्माण झाली त्यांचे  *कायदे कानून* यांच्या माध्यमातून माणसाच्या वर्तनावर मर्यादा आणणे, लोकशाही, मानवी हक्क इत्यादी अनेक रूपाने त्याचे विचार प्रगल्भ करणे या माध्यमातून ही  *माणुसकी विकसित* होण्याची प्रक्रिया चालू आहे. 
काहीवेळा सेल्फ गोल प्रमाणे त्यांनी नुकसान देखील केलं आहे.
300 वर्षे चाललेली सेमेटिक लढाई असो की अस्पृश्यता असो अशी अनंत उदाहरणे देता येतील. 
कोणी मोठा कोणी छोटा असेल वाढीत व घट करण्यात  *वाटा सर्वांचा च आहे*. 
झालं ते झालं आता  *पुढचे आव्हान मोठे आहे*.
 आपले हे जग राष्ट्रांमध्ये विभक्त असून ही एक *ग्लोबल व्हिलेज* होत आहे.
तसेच आपण आपापल्या धर्म किंवा संस्कृतीत राहून देखील एक ग्लोबल समजदारी, एक  *ग्लोबल मानव धर्म* विकसित करायचा हे सर्वांच्या फायद्याचे ठरणार आहे
त्यात आधीचे सगळे  *flows दूर करायचे*, स्वतःच्या  *चुका कबुल* करायच्या आणि मग त्याला दुसऱ्याने  *माफी* द्यायची.
तंत्रज्ञानामुळे जर होमो सेपिअन्स जाऊन एखादी  *super human species* निर्माण होणार असेल तर त्याला  *मानवतेची* वैचारिक, भावनिक  प्रगल्भता द्यायची गरज असणार आहे. ते  *आव्हान पेलण्याची जबाबदारी* आपली च असणार नव्हे का ?
Dr Prasad Phatak Pune 2. Phone 9822697288.

Comments