humanity means

मानवता म्हणजे माणुसकी ।
मानवता म्हणजे सर्व जण सुखी व्हावेत यासाठी असणारी अव्याहत खटपट । 
मानवता म्हणजे दुसऱ्याचा विचार करायचा, कोणाला दु:ख द्यायचं नाही आणि कोणाचं शोषण करायचं नाही ।
मानवता म्हणजे स्त्री दलित गरीब कृष्ण वर्णीय यांना पीडा न देता उलट समान वागनुक देणे । 
मानवता म्हणजे समूह करून इतर जगाला आपल्या  आधिपत्याखाली आणून नाडायचे नाही । 
मानवतेचा विरोध असतो -  शोषक, भ्रष्टाचारी, रावण आणि दुर्योधन यांना ।। मानवता म्हणजे वेळ पडली तर योग्य न्याय व्यवस्थेने त्यांना शासन करणे ।
मानवता म्हणजे माझ्यातले दोष मी च आधी दूर करणे व अधिक चांगला माणूस बनणे साठी सतत प्रयत्न करणे आणि तर करत असताना इतरांना पण त्यासाठी जागृत करणे 
मानवता म्हणजे सत्य,  प्रेम आणि करुणा बंधुभाव । 
ह्या मार्गांने गेले असता संपूर्ण जगातील मानवाचे भले होणार आहे
- वैद्य प्रसाद फाटक
संस्थापक अध्यक्ष 
मानव जागरण मंच,पुणे भारत, जग

Comments