*दिवाळी स्पेशल* तुका म्हणे होय मनासी संवाद : मी खूप वेळा बोलत असतो, तशी माझी दोन मने पण कधी कधी आपसात बोलत असतात! असाच एक संवाद प्रकट करतोय. मन१ व मन२ अशी सोप्पी नावे देतोय त्यांना. ...मन१ - तुला आठवतं का ? मन२ - काय रे ? मन१ - बरोबर ४० वर्ष झाली तू पेंडसे बाईंच्या अन्यायाची तक्रार घेऊन supervisor GDK कडे गेलास तेव्हा ते काय म्हणाले ? मन२ - आठवतंय की. ते म्हणाले की तक्रार नंतर पण आधी तू काय आहेस ? तू काय तुकारामाचा अवतार लागून गेलास काय ? मन१ - बरोब्बर. हुशार आहेस! मन२ - पण त्याच आत्ता काय ? मन१ - तेच तर ना ? सारखं मानव जागरण म्हणून कोकलतोस, काही लोक बोअर पण होतात. मन२ - हो पण मी लिहिलेलं वाचलं का असं कधी कोणाला विचारत नाही रे. मन१ - असूदे. पण मुद्दा असा आहे की हे सगळं लिहायला तू काय तुकारामाचा अवतार किंवा *मानवतेचा पुतळा* लागून गेलास का ? 😳 मन२ - हो खरं आहे रे मला माहीत आहे ते. किती जखमा आहेत ज्या अश्वत्थामा च्य कपाळातल्या जखम प्रमाणे भळाभळा वाहत असतात. पण मी असा विचार करतो की आपण प्रामाणिक प्रयत्न तर करत आहोत रोज कणभर का होईना, अधिक चांगला व म्हणून अधिक आनंदी माणूस बनत आहे. पूर्णत्व प्राप्त होई पर्यंत थांबलो तर जिंदगी खतम होऊन जाईल आणि समाजाच्या व माणसाच्या उपयोगाच्या या गुजगोष्टी माझ्या सोबत खलास होऊन जातील. जो हा अनुभव आपण घेतला तो सर्वांना मिळावा आणि थोडे बेटर जग होण्यात कणभर वाटा उचलावा म्हणून हा अगाऊ पणां करतो रे. कल का क्या भरोसा ?. मन१ - बरं बरं पण कोणाला फार पिळू नकोस रे बाबा! मन२ - ओके बाबा. _ *डॉ. प्रसाद फाटक, मानव जागरण मंच पुणे*
Comments
Post a Comment